मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काही बोलायचे आहे ☆ सुश्री निलिमा ताटके ☆

 ? कवितेचा उत्सव ?

☆ काही बोलायचे आहे ☆ सुश्री निलिमा ताटके ☆

काही बोलायाचे आहे, अनिवार्य आहे सांगणे.

कुणास ठाऊक, वेळ किती मज,

कधी येईल बोलावणे.

 

रुतलेले शब्द ह्रदयी, दाटून आला गळा,

मोकळे होऊन जावे,

का उगा सोशीशी कळा?

 

मनीचे स्वच्छ बोलायलाही लागते ताकद, हिंमत.

स्वच्छ मनाने समज तूही,

नसावे मनी गैरमत.

 

बोलण्यानेच वाढेल प्रेम, अन् संपेल दुरावाही अल्पसा.

चांदणे बरसेल राती,जर मन पारदर्षी आरसा.

© निलिमा ताटके

ठाणे.

मोबाईल 9870048458

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈