सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ भरजरी शालू… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
हे भरजरी वस्त्र आयुष्याचे,
वरदान मिळे जणू ईशाचे!
या शालूसम वस्त्रावरचे,
बुट्टे जरतारी निमिषांचे !….१
*
मृदू, रेशमी क्षणाक्षणांची,
काढली नक्षी रंगबिरंगी!
उभ्या आडव्या जरतारींनी,
खुलून जडली ती मनरंगी !…२
*
चंदेरी जरीच्या स्मृती तारा,
चमकती किती काठावरती!
संचित कोमल, सान,क्षणांचे,
नर्तन करिती मोर किती !…३
*
हा वार्धक्याचा रंग पांढरा,
मिसळला असे शालूत जरी!
जीर्ण शीर्ण हा शालू आगळा,
अधिक प्रौढ अन् मनहारी!
☆
© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈