मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – 🍁 मी_माझी – #4 – भूक…. 🍁 – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते (स्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की   चतुर्थ कड़ी  भूक …। इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी  प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। ) (e-abhivyakti की ओर से सुश्री आरूशी दाते जी का 'काव्यानन्द प्रतिष्ठान, पुणे' की ओर से विश्व महिला दिवस पर आयोजित काव्य प्रतिस्पर्धा में प्रथम स्थान प्राप्त करने के उपलक्ष में हार्दिक अभिनंदन।)     मी_माझी  – #4 – भूक …    भूक हा शब्दच अनेक उलाढाली घडवून आणायला कारणीभूत ठरतो... हो ना! शाळेत गेलं की आईने डब्यात काय दिलं असेल? किंवा घरी पोचल्यावर आई खायला काय देईल? हे विचार कायम ऑन असतात, कशासाठी ? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी ! कमवतो कशाला? पोट भरण्यासाठीच ना ! पोट भरण्यासाठी की जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ? इथे खरी गोम आहे, नाही का ! चमचमीत खायला मिळालं पाहिजे... माझा भाऊ नेहमी म्हणतो, तळीचा आत्माराम शांत झाला पाहिजे... ! सगळी धावपळ, अट्टाहास ह्याच साठी... theoretically speaking, ह्याने पोटातली भूक भागते, बाकीच्या भुका आहेत, त्यांचं काय ? बाकीच्या म्हणजे काय हे कळलं नाही ना? वैचारिक, भावनिक, शारीरिक, आर्थिक, आध्यात्मिक... अहो, इतकंच...
Read More

मराठी साहित्य – आलेख ☆ दप्तर मुक्त  शाळा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे  (श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं। इसके  अतिरिक्त आप एक आदर्श  एवं सम्माननीय शिक्षिका भी हैं । आपका  यह  आलेख निश्चित ही इसका प्रमाण है कि माह में कम से कम एक दिन विद्यार्थियों के लिए "बस्ता मुक्त पाठशाला" प्रयोग उनके सर्वांगीण विकास के लिए कितना आवश्यक है।) ☆ दप्तर मुक्त  शाळा ☆ प्रचलित शिक्षण पद्धती ही कृती प्रधान व विद्यार्थी केंद्रित असल्यामुळे ती विद्यार्थ्यांना आनंददायी कशी वाटेल यावर भर असून घोकंपट्टी, अभ्यास, शिक्षा, सक्ती, या गोष्टींना गौण स्थान प्राप्त झाले असून विद्यार्थी स्वछंदी राहून कृतितून शिकला पाहिजे ही संकल्पना शिक्षण क्षेत्रात स्विकारली गेल्यामुळे . दप्तर विना शाळा, बाल आनंद मेळावा, गणितीय बाजार सहल वनभोजन/निसर्ग सहल, परिसर भेट/ क्षेत्र भेट इत्यादी उपक्रमांना महत्त्व प्राप्त झाले.. या पैकीच एक उपक्रम  म्हणजे दप्तर विना शाळा महिन्यातून एक दिस आम्ही हा उपक्रम  घेतो. या दिवशी मुलांनी दप्तर न घेता शाळा करावयाची असते. नुतन वर्षा निमित्त आम्ही आज हा उपक्रम घेतला. ससकाळी मुलांनी सर्व बोर्ड ताब्यात घेतले अगदी सुचना फलक सह...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – 🍁 मी_माझी – #3 – अथांग… 🍁 – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते मी_माझी  – #3 – अथांग...  (स्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की  तृतीय कड़ी  अथांग …। इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी  प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )   सहज डोकावले... तसं डोकावायचं काही कारणही नव्हतं... पण किती वर्षांपासून हे करायचं राहूनच गेलं होतं... राहून गेलं होतं की मी ते मुद्दामून करत नव्हते...? त्याने काय फरक पडणार आहे? गोष्टी घडायच्या तेव्हाच घडतात... मग उगाच दोष, आरोप वगैरे कशाला...? असो, तर मी काय म्हणत होते? काहीच नाही गं, तू आता काही बोलूच नकोस... फक्त ऐक... पण काय ऐकू? शांत हो, गप्प बस, डोळे बंद कर आणि ऐक सगळं... म्हणजे? काहीच बोलायचं नाही? ......................... सगळं कसं शांत झालं होतं. थोडंसं कोरडं कोरडं वाटत होतं. मी जरा अस्वस्थच झाले होते. पण आज पर्याय नव्हता. एकेक आवाज नाहीसा होऊ लागला, तशी माझी उत्सुकता वाढू लागली. प्रत्येक क्षणी काय घडतंय ह्याकडे लक्ष जायला लागलं. हळू हळू रंगही नाहीसे झाले, तरंग शांत झाले, तसे शहारे बोलू लागले. सुरुवातीला अर्थ लागत नव्हते, पण आता काठावर बसून समोरच्या डोहातील माझं प्रतिबिंम्ब दिसत होतं, ते...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – 🍁 मी_माझी – #2 – स्वतःपण… 🍁 – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते मी_माझी  – #2 – स्वतःपण...  (स्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की द्वितीय कड़ी  स्वतःपण... । इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी  प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )   स्वतःशी बोलता आलं पाहिजे, बोलता बोलता थांबता आलं पाहिजे...   हे कसं जमायचं? ह्याच विचारात स्वतःशी कधी बोललेच नाही, आणि जेव्हा बोलले, तेव्हा, स्वतःची ओळख पटेना ! मी कशी आहे, कशी असायला पाहिजे, कशी होते, का होते, असे अनेक प्रश्न रुंजी घालतात...   उत्तरांच्या जंजाळात मी स्वतःचं स्वतःपण विसरून जाते...   खरंच, असं काही आहे का?   स्वतः पण...   हे काय असतं, कोणी सांगेल का मला?   आतून उत्तर येतं, कोणीच सांगू शकणार नाही, तुलाच ते शोधायचं आहे आणि त्याबरोबर जगायचं आहे... स्वतःपण आणि स्वार्थ ह्यात जमीन आसमानचा फरक आहे, हे विसरू नकोस...   मग तुझ्या स्वतःपणला लकाकी येते की नाही बघ... झोपेतून जागी झाले तेव्हा एवढंच कळलं, काही तरी नक्की हरवलंय, तेच स्वतःपण नसेल ना !   © आरुशी दाते...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – 🍁 मी_माझी – #1 – Space 🍁 – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते मी_माझी  - #1 - Space   (हमें आपको यह  सूचित करते  हुए अत्यंत प्रसन्नता का अनुभव हो रहा है कि सुश्री आरुशी दाते जी को हाल ही में  साहित्य संपदा द्वारा आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा में उनकी कविता "वसंत" को द्वितीय  पुरस्कार से सम्मानित किया गया है। e-abhivyakti की ओर से आपको हार्दिक बधाई। आप e-abhivyakti  में  प्रकाशित पुरस्कृत कविता "वसंत" को इस लिंक पर क्लिक कर पढ़ सकते हैं >>> http://bit.ly/2YTTIFX ) प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ - "मी _माझी " शृंखला की प्रथम कड़ी  Space । इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी  प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे।    ती रुसली आहे हे त्याला माहित होतं, त्यानेही तिचा रुसवा जाण्याची वाट पाहिली... ह्या वाट पाहण्यात दोघांनी स्वतःला योग्य वाटली ती उत्तर घेऊन पुढे वाटचाल केली... मागे फिरण्याचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला... योग्य अयोग्य ठरवायला मौनातल्या शब्दांना आधारच उरला नव्हता... स्वतःच स्वतःचे पाऊल त्या वाटेकडे न्यायचे नाही हा निर्धार पक्का झाला होता... ती म्हणते हेही माझे प्रेमच आहे, त्याला स्वातंत्र्य देण्याचे ... पण त्याला काही...
Read More

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्यातील नाते ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते ☆डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्यातील नाते☆ (प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  द्वारा  राष्ट्र निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर  जी के १२८ वीं जंयती पर "काव्य विचार मंच  द्वारा राज्यस्तरीय लेख प्रतियोगिता हेतु रचित शोधपूर्ण लेख  जिसमें  डॉ  आंबेडकर जी  एवं रमाई जी के सम्बन्धों का उल्लेख मिलता है।)  ) उजेडाच्या झाडाखाली, रमा मातेची  पाखर. शब्दा शब्दांतून झरे, तिच्या स्नेहाचा पाझर.. . ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर  एक  उजेडाच झाड. रमाबा ई आंबेडकर या नावाची पखरण वैवाहिक जीवनात होताच हे  उजेडाच झाड आपल्या कार्य कर्तृत्वाचा परीघ वाढवीत गेलं. रमा वलंगकर हे रमाबाईचे माहेरचे नाव. भायखळ्याच्या भाजी मार्केट मध्ये इ. स. 1906 मध्ये रमाबाई आणि भीमराव आंबेडकर विवाह बद्ध झाले. चौदाव्या वर्षी बाबासाहेबांचे दोनाचे चार हात झाले.  अवघ्या नऊ वर्षाची रमाई बाबासाहेबांची सहचारिणी झाली  आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुरू झाले. गतीमान  आयुष्याची, नितीमान वाटचाल भवसागरी झेलली,  सुख दुःखे दरसाल. . .!       अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. माहेरची परीस्थिती जेमतेम होती.  कुठलाही डामडौल नाही दिखावा नाही.  अत्यंत साधेपणाने हा विवाह संपन्न झाला ...
Read More

मराठी साहित्य – मराठी आलेख – 🍁 मी एक मनस्वी 🍁 – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे   मी एक मनस्वी (सुश्री प्रभा सोनवणे जी  हमारी  पीढ़ी की एक ज्येष्ठ मराठी साहित्यकार हैं । उनका यह  संस्मरण  आलेख/संस्मरण निश्चित ही हमारी समवयस्क पीढ़ी को अस्सी  के दशक के दिन याद दिला देगा। ) मनस्वी, अविचाराने, अव्यवहार्य असं मी अनेकदा वागलेली आहे. आई वडिलांची भीती वाटायची, धाक होता. खरंतर चाकोरीबध्द आयुष्य असायला हवं होतं, पण मी चाकोरी बाहेरचे अनुभव घेतले,आठवीत असताना मुली म्हणाल्या कुठेतरी सहलीला जाऊ, एक मैत्रीण म्हणाली, "हिच्या शेतावर जाऊ" - म्हणजे माझ्या, आई परवानगी देणं शक्य नव्हतं, मैत्रिणीच्या शेतावर, जवळच जाणार असं सांगितलं, आमचं गाव, शेत पंधरा किलोमीटर होतं, एसटी नं जावं लागणार होतं जवळ कंपासबॉक्स साठी वडिलांनी दिलेले पैसे होते ते खर्च केले, ट्रीप चा आनंद घेतला, सहाजणी गेलो होतो, सहल छान झाली, त्या सहलीवर आशा देव नावाच्या आमच्या मैत्रिणीने कविताही केली, अर्थातच संध्याकाळी आईला समजलं, बोलणी खावी लागली, पण एक वेगळा अनुभव घेतला!  लग्न अतिशय जुन्या मताच्या घरात झालं, हातात बांगड्या, डोक्यावर पदर!  मैत्रिणीबरोबर ब्युटीपार्लर मध्ये गेले तिथे ब्युटीशियन म्हणाली, कुरळ्या केसांसाठी बॉयकट...
Read More

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ किती वाचले? ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम ☆ किती वाचले?  ☆ (श्री सुजित कदम जी का यह आलेख वास्तव में हमें पुस्तकों की दुनिया से रूबरू कराता है। यह एक शाश्वत सत्य है कि आज पुस्तकों के पाठक कमतर होते जा रहे हैं और यहाँ तक कि पुस्तकालयों का अस्तित्व भी खतरे में है। यह आलेख समाज में पुस्तकों  के महत्व को अवगत कराता है।) आयुष्यात आपण किती कमवलं ह्या पेक्षा किती वाचलं हा विचार जोपर्यंत आपण करत नाही..तो पर्यंत आपण फक्त श्वास घेण्यापूरता जन्माला आलोय असं समजावं..,कारण पुस्तके वाचताना आपल्याला पुस्तकातली एखादी व्यक्तीरेखा आपलीशी वाटू लागते.. ती व्यक्तीरेखा आपण जगत जातो.. किबंहूना जगत असतो..,अशा एक ना अनेक पुस्तकातून आपणच आपल्याला नव्याने घडवत जातो. ही जडण घडण होताना समाजाचा एक भाग बनून रहाता आल पाहिजे. जहालाशी जहाल आणि मवाळाशी मवाळ संवाद साधता आला की माणस  आपोआप जवळ येतात. पुस्तकांसारखे ती ही बरंच काही शिकवून जातात. आवडत्या पुस्तकाची तर आपण कित्येक पारायण करतो .. का? तर त्यात कुठेतरी, आपल्याला मनासारखं जग, जगण्याची जिद्द, समाधान, वास्तवतेचं भान, आणि योग्य दिशा असं बरचं काही...
Read More

मराठी साहित्य – मराठी आलेख – 🍁 मोरपीस 🍁 – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस मोरपीस  (सुश्री ज्योति हसबनीस जी की लेखनी में एक अद्भुत क्षमता है किसी भी वस्तु, शब्द अथवा भावों को परिभाषित करने की अथवा किसी भी विधा में साहित्य रचने की। संभवतः 'मोरपीस' अथवा 'मोरपंख' अथवा 'मोर का पंख' अनायास ही हमारे नेत्रों के समक्ष न केवल मोर के उस कोमल पंख की झलक दिखलाता है अपितु यह आलेख बचपन से लेकर अब तक की हमारी स्मृतियों में विस्मृत करने हेतु पर्याप्त है।)   एखाद्या शब्दाची कशी आपली एक स्वतंत्र ओळख असते, अस्तित्व असतं. त्याचं दिसणं, असणं, जाणवणं, अगदी रंग, रूप, स्पर्शासकटच अगदी खास त्याचं त्याचंच असतं . गुलाब म्हटला की पाकळ्या पाकळ्यातून डोकावणारा राजबिंडा रूबाब अगदी रूतणाऱ्या काट्यासकट डोळ्यासमोर येतो, तर मोगरा म्हटला की अगदी श्वासा श्वासात भरभरून तनमन धुंद करणारी मोगऱ्याची ओंजळच नजरेसमोर येते, तर प्राजक्त बकुळीचं नाव जरी उच्चारलं तरी नाजुक फुलांचा अंगणभर पडलेला सडा आणि तो नाजूक दिमाख मिरवणारं श्रीमंत अंगणच डोळ्यासमोर साकारतं! रंग रूप स्पर्श गंधाचं अवघं जगच त्या त्या शब्दांमध्ये सामावलेलं असतं. असाच एक शब्द...
Read More

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ प्रेमा तुझा रंग कसा? ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते ☆ प्रेमा तुझा रंग कसा? ☆   या विषयावर विचार प्रकट करताना, आठवतात ओळी, 'पाण्या तुझा रंग कसा? ' एखाद्या व्यक्तीवर जीव जडतो. त्याचं शारीरिक, मानसिक, वैचारिक सौंदर्य मनाला भुरळ घालत.  अशा व्यक्तीच्या सहवासात मन रमत.  आणि सुरू होतो प्रेमाचा प्रवास. प्रेम हे पाण्याइतकच जीवनावश्यक. जीवनदायी. प्रेमाचा अविष्कार नसेल तर,  आयुष्य निरर्थक, निरस, कंटाळवाणे होईल. प्रेम दिसत नसले तरी,  त्याचे रंग अनुभुतीतून जाणवतात. कुणाच्या नजरेतून, कुणाच्या स्पर्शातून, कुणाच्या काळजीतून,  कुणाच्या आचारातून , कुणाच्या विचारातून, कुणाच्या सेवेतून, कुणाच्या त्यागातून, कुणाच्या आधारातून प्रेमरंगाच्या विविध छटा  अनुभवता येतात. असं हे रंगीबेरंगी प्रेम,  ह्रदयात जाणवत. . . आणि व्यक्त होताना कुणाचं तरी ह्रदय हेलावून टाकत. हा प्रवास  असतो. . सृजनाचा. माणूस माणसाशी जोडला जातो. परस्परात नातं निर्माण होत.  अनेक विध नात्यातून व्यक्त होणारे प्रेम माणसाला पदोपदी एकच संदेश देत. . . तो म्हणजे. . . ''तू माणूस  आहेस. . '' एकदा का व्यक्तीला स्वत्वाची जाणिव झाली कि तो स्वतःवर, नात्यांवर,  देशावर प्रेम करायला लागतो. प्रेम हे एक रेशमी कुंपण  असते.  आपणच आपल्या आत्मीयतेने हा परीघ...
Read More