मराठी साहित्य – मराठी कथा/लघुकथा – ☆ साहेब…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम ☆ साहेब...! ☆  (श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।) त्या दिवशी ऑफिस मधलं सारं काम आटपून मी बाहेरच्या चहाच्या गाडीवर येऊन थांबलो महीना आखेर मुळे पाकीटातल्या कमी झालेल्या पैशाची गोळा बेरीज आणि घरी जाताना पुन्हा ट्रेन मध्ये तीच धक्काबुक्की तीच गर्दी डोक्यात प्रश्नांची सरमिसळ चालू असतानाच ,चहाचा एक एक घोट  ट्रेन च्या लढाईवर जाण्यासाठी मला सज्ज करत होता. चहा संपवून मी चहाचा कप खाली ठेवणार  एवढ्यात " साहेब " ही करूण हाक माझ्या कानावर पडली. मी त्या दिशेने पहाताच माझ्या समोर त्या माऊलीने पसरलेला हात मागे घेतला. तिच्या सोबत असणारं तिच लहान लेकरू तिला घट्ट बिलगून उभ राहील होतं. मी तिच्या हातावर रूपाया देण्यासाठी खिशात हात घालणार , एवढ्यात त्या माऊलीने पुन्हा माझ्यासमोर हात पसरला आणि लेकरांबद्दलची सारी माया एकवटून तिनं, "साहेब  'पाच रू' आहेत का ?" म्हणून  विचारलं....
Read More

मराठी साहित्य – कथा/लघुकथा – 🍁 वृत्ती -निवृत्ती 🍁 – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे   वृत्ती -निवृत्ती (सुश्री प्रभा सोनवणे जी  हमारी  पीढ़ी की एक वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं ।  हमें हमारे अस्तित्व से रूबरू कराती हुई वृत्ती -निवृत्ती  जैसी लघुकथा सुश्री प्रभा सोनवणे जी जैसी संवेदनशील लेखिका ही लिख सकती हैं।) आजही कामवाली  आली नाही. निशा भांडी घासायच्या तयारीला लागली पण बराच वेळ भांडी घासायची मानसिकता होईना, नवरा म्हणाला "शेजा-यांच्या बाईला सांग ना आपलं काम करायला"! "असं ऐनवेळी कोणी येणार नाही." असं म्हणत ती भांडी घासायला लागली! कामवाली जे काम वीस मिनीटात करते त्याला पाऊण तास लागला! हुश्श ऽऽ    करत निशा आराम खुर्चीत बसली. मोबाईल हातात घेतला उगाचच दोन मैत्रिणीं मैत्रिणींना फोन केले, नंतर फेसबुक ओपन केलं...तर समोर नॅन्सी फर्नांडिस  चा फोटो, "people you may know" मधे नॅन्सी फर्नांडिस! तिची कॉलेज मधली मैत्रीण! निशा ला अगदी युरेकाऽऽ युरेकाऽऽ चा आनंद! पन्नास वर्षांनी मैत्रीण फेसबुक वर दिसली! बी.एस.सी. च्या शेवटच्या वर्षी त्या दोघींचं कशावरून तरी बिनसलं होतं. सख्ख्या मैत्रिणी वैरीणी झाल्या! पण त्या क्षणी निशाला नॅन्सी ची तीव्रतेने आठवण आली.  कॉलेज च्या पहिल्या दिवशीच नॅन्सी भेटलीआणि मैत्री...
Read More

मराठी साहित्य – कथा/लघुकथा – ☆ वेळ ☆ – सौ. सुजाता काळे

सौ. सुजाता काळे ☆ वेळ ☆ (सौ. सुजाता काळे जी की कथा 'वेळ' इस भौतिकवादी एवं स्वार्थी संसार की झलक प्रस्तुत करती है। इस मार्मिक एवं भावुक कथा के एक-एक शब्द , एक-एक पंक्तियाँ एवं एक-एक पात्र हमें आज के मानवीय मूल्यों में हो रहे ह्रास का एहसास दिलाते हैं ।यह जीवन की सच्चाई है। मैं इस भावनात्मक सच्चाई को कथास्वरूप में रचने के लिए सौ. सुजाता काळे जी की लेखनी को नमन करता हूँ।)   त्या दिवशी पहाटेच माईंना धाप लागली. त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. एवढया पहाटे दवाखाने बंद ....   काय करावे? मॉर्निंग वॉकला निघालेल्या स्नेही डॉक्टरांनी तपासले. दवाखाना उघाडल्यावर ताबडतोब एडमिट करायवयास सांगितले. माईंच्या सुनेने रेवतीने कसं बसं बळजबरीने  त्यांना चहा बिस्किटे खायला घातली. ते शेवटचे होते असं त्यावेळी तिच्या कल्पनेतही नसणारं..... सकाळी  दवाखाना उघडल्याबरोबर माईंना दवाखान्यात नेल. डॉक्टरांनी त्यांना एडमिट करून घेतलं. लगबगीनं तपासलं. सगळया तपासण्या झाल्या आणि डॉक्टरांनी माईंची शेवटची स्टेज आहे असं घोषित केलं. रेवतीने डॉक्टरांशीच वाद घातला. काहीही बडबडु नका म्हणाली......  नाडी तपासली तर ठोके खूप कमी.  बी.पी. कमी........
Read More

मराठी साहित्य – मराठी कथा/लघुकथा – ☆ शिकवण ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम ☆ शिकवण ☆  (श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।)   काल खूप वर्षांनंतर एक ओळखीचे काका भेटले,  मस्त गप्पा मारल्या...! मला म्हटले ,''काय करतोस..?'' मी म्हटलं...''.छोटसं दुकान आहे...'' मी काही बोलायच्या आधीच.. त्यांनी बोलायला सुरुवात केली..; ''ह्या सोसायटीत माझा मोठा फ्लॅट आहे.., घरात धुणं भाड्यांला कामवाली आहे.., फोर व्हिलर ही आहे..; पण ह्या वयात चालवायला भिती वाटते, आम्ही दोघंच असतो बघ इथे रहायला...! पेन्शन मध्ये जेवढं भागवता येईल तेवढं भागवतो . मोठा मुलगा अमेरिकेत असतो... दुसरा मुलगा ईथे जवळजच राहतो ..., दोघांनाही त्यांच्या मनासारखं शिकवलं.. आता  ते दोघेही *वेल सेटल* आहेत...'' काका  मनसोक्त बोलत होते मी ऐकत होतो..., ''वर्षां दोन वर्षांनी मोठा अमेरिकेतून मुलगा येतो भेटायला.. काही दिवस राहतो.. त्याची इथली कामे झाली की विचारतो,  '' किती पैसे देऊ? '' ''बेटा पैसाच आता  आमच्यातला दुरावा बनत चाललाय बघ.  आमच्या गरजा आता भावनिक  आहेत. '' ''दुसरा मुलगा खूपच बिझी असतो त्याला तर अजिबात वेळ मिळत नाही... ...
Read More

मराठी साहित्य – मराठी कथा – *अपुरे घरटे* – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे  *अपुरे घरटे* (इस अत्यंत शिक्षाप्रद एवं हृदयस्पर्शी लघुकथा के लिए  श्रीमति रंजना जी की लेखनी को सादर नमन) सकाळची वेळ होती कोवळे ऊन पडलेले होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होतं. आज मंगळवार  बाजारचा दिवस असल्यामुळे मजूर लोकांना कामाला सुट्टी होती. ओळखीचे  एकजण सुट्टीच्या दिवाशी "काही काम आहे का ताई" विचारायला आले . काय काम सांगावे हा विचार करत असतानाच, घराच्या दोन्ही बाजूला बाभळीच्या फांद्या मधे डोकावणाऱ्या फांद्या दिसल्या.  येताजाता त्यांचे काटे अंगाला टोचत असत. " मामा याच्या मधे आलेल्या फांद्या कट कराल का?"  "हो करतो की ताई" असे म्हणून ते कुऱ्हाड आणायला निघून गेले आणि मी शाळेला गेले. चार वाजता येऊन पाहिले आणि  त्याला फांद्या तोडायला सांगून अक्षम्य अपराध केल्यासारखे वाटायला लागले . कारण डेरेदार वाढलेल्या बाबळीच्या प्रत्येक फांदीवर सुगरणींचे अनेक घरटे जवळजवळ शेवटच्या टप्प्यावर आलेले होते जवळपास एक महिन्याच्या अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते बिचारे जीव घरटे तयार करत होते. मुख्य म्हाणजे पोर्च मधे बसून त्यांची कारागीरी पाहणे हा माझ्यासाठी आवडता छंदच बणलेला होता. काडी काडी जमवून घरटे तयार करणारे सुगरण पक्षी पाहून...
Read More

मराठी साहित्य – कथा/लघुकथा – घरटं  – श्री सदानंद आंबेकर

श्री सदानंद आंबेकर            घरटं  श्री सदानंद आंबेकर जी की हिन्दी एवं मराठी साहित्य लेखन में विशेष अभिरुचि है।  गायत्री तीर्थ  शांतिकुंज, हरिद्वार के निर्मल गंगा जन अभियान के अंतर्गत गंगा स्वच्छता जन-जागरण हेतु गंगा तट पर 2013 से  निरंतर प्रवास। कल आपने श्री सुजित  कदम  जी  का  मराठी आलेख – * घराचे घरपण * पढ़ा। आखिर चिड़िया का घोंसला भी तो घर ही है?  इसी क्रम में हम श्री सदानंद आंबेकर जी  के आभारी हैं इस मराठी  लघुकथा  – “घरटं ” के लिए जो कि उनके जीवन के ही एक प्रसंग से प्रेरित है। ) शहरातील प्रसिद्ध समाजसेवक, अनेक धर्मार्थ संस्थांचे प्रमुख आणि नामवंत बिल्डर, डॉ प्रताप आपल्या बालकनी मधे त्यांच्या धर्मपत्नी सह बसून सकाळच्या चहा चा आनन्द घेत होते। देशकाळाची चर्चा होत असतांना अचानक प्रताप चे लक्ष बालकनी मधे ठेवलेल्या उंची लाकडी रॅक कडे गेले, त्यात सर्वात वरच्या कप्यावर दोन सुरेख लहानगे पक्षी येर-झार करीत होते। लक्ष देऊन पाहिले तर कळले कि ते वारंवार येत-जात, वाळके गवत, कापूस, पंख इत्यादि वस्तु आणून तिथे आपले एक घरटं बनवून राहिले आहेत।...
Read More

मराठी साहित्य – मराठी आलेख – * कुठलाही निर्णय घेताना मुलांना विश्वासात घ्या * – सुश्री रंजना लसणे

सुश्री रंजना लसणे  कुठलाही निर्णय घेताना मुलांना विश्वासात घ्या (आदरणीया सुश्री रंजना लसणे जी के शिक्षिका/लेखिका हृदय का अभिनंदन।  इस अत्यंत शिक्षाप्रद एवं हृदयस्पर्शी कथा के लिए सुश्री रंजना जी को सादर नमन) जून महिना म्हणजे प्रवेशाची गडबड नवीन येणाऱ्या मुलांची ओळख करून घेणे, त्यांच्या आवडी निवाडी जाणून घेणे, एकदम उत्साहाचे वातावरण, मी मुलांशी छान गप्पा मारत होते  एवढयात  एक नवीन विद्यार्थी प्रवेश झाला. नाव ऋषीकेश नावा प्रमाणे  दिसायला सुंदर  गोरागोमटा स्मार्ट  अभ्यासातही चांगला  होता. पाहताच मनात भरावा असं व्यक्तीमत्व, वरकरणी पाहता सर्व काही ठीकठाक वाटायचे, परंतु  दिसतं तसं अजिबात नव्हते. मुलांच्या रोज नवीन तक्रारी,  "मेम याने मला मारलं". कधी दगड कधी छडी तर कधी लाताळी, बर विचारलं तर एकही शब्द न बोलता गप्प उभा राहायचा समजावून पाहिलं  चिडून पाहिलं एकदोन वेळेस  मारून ही पाहिलं. मुख्याध्यापकांकडे नेऊन टी.सी. देईन असे सांगितले, परंतु काहीच बदल  नव्हता. एक दिवस तर त्याने एका मुलाचं चक्क  दगड मारून डोके फोडलं. मला या मुलाचं काय करावं खरंच कळत नव्हतं  तीस वर्षाची नोकरी करून मला एका मुलाला समजावून सांगता येतं...
Read More

मराठी साहित्य – मराठी कथा / लघुकथा – * दुर्दम्य * – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस दुर्दम्य (प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी   की  एक भावुक लघुकथा दुर्दम्य। ) एssss सुनंदाsss अत्यंत चिरक्या आणि घोगऱ्या आवाजातली हाक आणि त्या पाठोपाठ दणदण पायऱ्या उतरणारी मोंगोल वळणाची , उमलू घातलेली, घट्ट दोन वेण्यांचे हेलकावे मिरवणारी मुलगी आणि तिच्या उतरण्याकडे अनिमिष नजरेने बघणारा जिन्याच्या पहिल्या पायरीवर असलेला पूर्ण पुरूषाच्या वाटेवरचा मोंगोल चेहरेपट्टीचा मुलगा ..काळजात चर्रर्र झालं ते दृष्य बघून ! मतिमंद म्हंटलीत तरी निसर्गाने आपलं काम चोख बजावलं होतं. शारीरिक बदलाची चाहूल आणि प्रीतीची कोवळीक नजरेत उतरली होती. पण ह्या साऱ्याचं रूपांतर कशात होणार ह्या जाणीवेने मात्र माझं मन सुन्न झालं, आणि झर्रकन् भूतकाळात गेलं. माझ्या कळत्या वयात एक कुटुंब आमच्या घराशेजारी राहायला आलं होतं. त्या कुटुंबात एक छोटा मुलगा आजूबाजूच्या समवयस्क मुलांच्या टिंगल टवाळीचा विषय झाला होता. त्याला आपल्यात खेळायला घेणं तर दूरच पण त्याच्या बोलण्यावर हंसणं, त्याच्यावर उगाचच दादागिरी करणं, त्याला चिडवणं हा त्या मुलांचा दिनक्रम ठरलेला. शेवटी वैतागून आईचं त्याला घरात डांबून ठेवणं आणि त्याने आसुसून खिडकीतून मुलांचे खेळ बघणं हे त्याने स्विकारलं होतं. काहीच दिवसांत त्यांची परत दुसऱ्या गांवी बदली...
Read More

मराठी साहित्य – मराठी कथा / लघुकथा – *ऊस डोंगा परी……..* – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस ऊस डोंगा परी........ (प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी   की लघुकथा ऊस डोंगा परी........। ) रात्रीची फ्लाईट घेतांनाच मनावर एक प्रकारचं दडपण आलं होतं. एयरपोर्टपासून घर बरंच दूर होतं. रात्रीच्या वेळी पायाखालचा रस्ता, सवयीची वळणं देखील अनोळखी भासू लागतात, रस्त्यावरचे दिवे बऱ्याचदा काळोखच उजळ करतायत की काय असा भास होत असतो. पण वेळेचं आणि पैशाचं  गणित सोडवण्याचा हाच एक उत्तम पर्याय असल्याने जिवाच्या कराराने शेवटी हाच निवडला , आणि आता ज्याची भिती वाटत होती तेच झालं. चांगली दीड तास लेट झाली होती flight! विमान लॅंड होऊन सामान मिळेपर्यंत ११.३० च वाजले होते. सामान घेऊन बाहेर पडले आणि रिक्षेवाले टॅक्सीवाले मागे पुढे घोटाळायला लागले, टॅक्सी की रिक्षा अशी दोलायमान स्थिती असतांनाच एक काळाकभिन्न,  राकट, डेरेदार पोटाचा, घेरदार माणूस जणू मला घेरल्यासारखाच जवळ आला. 'चला आपल्या रिक्षेत बसा, सामान द्या, तुम्ही व्हा पुढं!' मला हो नाही म्हणायची संधी ही न देता. जणू त्याने फर्मानच सोडलं त्याच्या रिक्षेत बसायचं. आणि त्याने एका माणसाला इशारा केला, त्यासरशी त्या माणसाने सराईतपणे रिक्षा जवळ आणून उभा केला आणि माझं सामान...
Read More

मराठी साहित्य – मराठी कथा / लघुकथा – * तरूणाई * – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस तरूणाई (प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी   की लघुकथा तरूणाई। ) ‘आई मैत्री वेगळी, आणि व्यवसाय वेगळा’. व्यवसायात माझा पार्टनर म्हणून जरी आता तो राहिला नसला तरी आमच्यातली मैत्री तर तशीच आहे आणि तशीच राहणार. मित्र म्हणून तो आजही मला तितकाच आवडतो. नाही जमलं त्याला धंदा सांभाळणं, नाही मानवलं आम्हाला त्याचं व्यवसायाकडे दुर्लक्ष करणं. नविन नविन व्यवसाय, झोकून देऊन काम करून सुरूवात केली खरी आम्ही सगळ्यांनी, पण नाही राखता आलं त्याला उत्साहातलं सातत्य, देखरेखीतली जागरूकता, हिशेबातली सतर्कता! जाण असूनही नाही पेलता आली जवाबदारी, पण म्हणूनच दिला ना त्याला डच्चू! आम्हीच एकत्र बघितलेल्या स्वप्नाच्या मनोऱ्याचा एक खांब खणून बाजूला फेकतांना कोण यातना झाल्या आम्हाला, पण व्यवसाय सुरळीत चालावा, धंद्याला रूप यावं, म्हणून मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला, आणि योग्य वेळी निर्णय घेतल्याचा समाधानाचा सुस्कारा देखील सोडला. पण याचा अर्थ असा नाही ना होत की पार्टनरशीप बरोबर दोस्तीचाही शेवट झालाय! अगं कधीही काही सल्ल्याची गरज भासली , तर आम्ही धाव घेणारच त्याच्याकडे! अगं काय सुपीक डोकं आहे त्याचं, काय भन्नाट कल्पना असतात त्याच्या, हा...
Read More