मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ वसंत फुलला मनोमनी ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे   (वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है।  आज प्रस्तुत है उनकी वसंत ऋतु पर आधारित  भावप्रवण कविता  “वसंत फुलला मनोमनी”।)    ☆ वसंत फुलला मनोमनी ☆   नवपल्लवीने नटली सजली सृष्टी ! सुगरण विणते पिलांसाठी घरटी ! कोकीळेचा पंचमस्वर गुंजतो रानी ! भारद्वाजचे फ्लाईंग दर्शन सुखावते मनी ! भ्रमर गुंजती मधु प्राशती फुलातुनी ! आला वसंत आला झाला आनंद मनोमनी !!१!!   शेतात मोहरी सोनफुले फुले पीतमोहर ! घाटात भेटे लाल चुटुक पळसकाटेसावर ! दारोदारी फुलला लाल गुलमोहर ! बकुळ फुलांच्या गंधचांदण्या बहरे लाल कण्हेर ! देवचाफा सोनचाफा कडुलिंब ही बहरावर ! आला वसंत आला आनंद झाला खरोखर !!२!!   कमलपुष्पे फुलली बहरली जास्वंद सूर्यफुलं! रंगबिरंगी गुलाब फुलले फुलली बोगनवेल ! अननसाची लिली फुलली बहरे नीलमोहर ! झिनिया पिटोनिया गॅझेनियाला आला हो बहर ! डॅफोडिल्स अन् ट्यूलिप्सने केला हो कहर ! आला वसंत आला फुलला मनोहर !!३!!   कोकणात सुरंगी फुले मोहक मदधुंद ! त्यांचा सुंदर गजरा माळला केसात ! मोगऱ्याचा दरवळला मंदसा सुगंध ! मोहविते रातराणी धुंद आसमंत ! मोहरले मी अन् कळले मजला...
Read More

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ वृक्षवल्लरी लावुचला ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे   (वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है।  आज प्रस्तुत है उनकी पर्यावरण सुरक्षा एवं वृक्षारोपण का अतिसुन्दर संदेश देती हुई मधुर कविता “वृक्षवल्लरी लावुचला”।)    ☆ वृक्षवल्लरी लावुचला ☆   चला चला रे चला चला वृक्ष वल्लरी लावु चला !!धृ.!!   हरितगृहाच्या मखमालीची खुलली दालने धनदौलतीची प्रदूषणाला पळवून आपण वाचवू ओझोन वायूला !!१!! चला चला रे ....   वटवृक्षाची आगळीच शान हिरव्या हिरव्या पानांत बुंदके लाल छान वटपौर्णिमेला ह्यालाच मान आधारवड हा पांतस्थांचा पक्षीगणांचा रक्ष त्यांचे करु चला !!२!!चला चला रे...   कल्पवृक्ष हा मूळ कोकणी गोड खोबरे मधुरचि पाणी अघटित ही देवाची करणी तेल तूप अन् सुंदर शिल्पे तयापासुनि बनवू चला !!३!! चला चला रे...   आम्रवृक्ष हा भव्य देखणा आम्रमंजिरी मोहवी मना घमघमाट हा दरवळे वना. आम्ररसाच्या मधुर सेवना आपण सारे आता पळू चला !!४!! चला चला रे...   मृदंग जैसा फणस देखणा वरि काटे परि आत गोडवा निसर्गातला अगम्य ठेवा कोकणातला अमोल मेवा फणसगरे आता खाऊ चला !!५!! चला चला रे..   साग शिशीर उंबर पिंपळ चंदन चंपक. करंज जांभूळ हिरडा बेहडा बकुळ बहावा घाटामधुनि तया पहावा दर्शन त्यांचे करु चला !!६!!चला चला...
Read More

मराठी साहित्य – कविता ☆ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मृती दिन निमित्त ☆ अण्णा माझा. . . ! ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते   (आज प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी  की स्व. अण्णा भाऊ साठे जी  के स्मृति दिवस पर एक रचना।स्व  अण्णा भाऊ साठे जी को सादर नमन ) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृती दिन. त्या निमित्ताने ही रचना लोकार्पण. . . . !   - विजय यशवंत सातपुते, पुणे   ☆ अण्णा माझा. . . ! ☆ भाऊराव वालुबाई पोटी जन्मे तुकाराम. जाईबाई नी शंकर भावंडांचे निजधाम. वाटेगावी जन्मलेला साहित्यिक तुका थोर कथा, काव्य, पोवाड्यांचा अभिजात  आहे जोर. . . ! लोककला,  वगनाट्ये गवळण ,  बतावणी गण,  वग ,  प्रबोधन केली समाज बांधणी. . . . ! वर्ग विग्रहाचे ज्ञान समाजात रूजविले लाल बावटा संस्थेने क्रांतीसूर्य घडविले. . . ! पोटासाठी तुकाराम जागोजागी करी काम आयुष्याचे केले रान नाही घेतला आराम. . . ! अण्णा नावे प्रिय झाला रूढ झाला कथाकार. दीन दलितांची दुःखे त्यांचा झाला भाष्यकार. . . ! एकवीस कथाग्रंथ कादंबरी एकतीस कम्युनिस्ट विचाराने प्रबोधन साधलेस.. . . . ! वगनाट्ये तेरा चौदा अजूनही काळजात विघातकी रूढींवर केली लेखणीने  मात. . . ! महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्तीचा संग्राम वार्ताहर, कथाकार विचारात राही ठाम. . . . . ! रशियन , फ्रेंच आणि इंग्रजीत भाषांतर शोषितांचे अंतरंग भावनांचे वेषांतर. . . . ! रंगभूमी कलावंत 'इप्टा’ चाही कार्यभार स्वीकारला कर्तृत्वाने जग भरात संचार.....
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 8 – कॅनव्हास…! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम   (श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं। यह सच है कि अक्सर हमारे  जीवन  के रंग हृदय के कॅनव्हास से नहीं उतर पाते और प्रकृति के रंग उस पर चढ़ नहीं पाते।   आज प्रस्तुत है उनकी  एक संस्मरणात्मक भावुक कविता  “कॅनव्हास...!”। )   ☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #8 ☆    ☆ कॅनव्हास...! ☆    गेल्या कित्येक वर्षात माझ्या कॅनव्हास वर पावसाचं चित्रंच उमटलं नाही... का कोणास ठाऊक आता पहील्या सारखा पाऊस रंगामध्ये दाटूनच येत नाही कितीतरी वेळ मी कॅनव्हास समोर ठेवून त्याच्याकडे एक टक पहात रहातो आता तर कॅनव्हास वर श्वास घेणारे रंग ही पाऊस म्हटलं तरी ब्रश वर गोठायला लागलेत कारण... माझ्या बापाला माझी माय गेल्यावर रडताना पाहीलं आणि तेव्हाच काय तो हवा तेवढा पाऊस नजरेत साठवला त्या वेळी त्या पावसाचं चित्र काळजाच्या इतक्या खोलवर जाऊन उमटलं की तेव्हापासून हा बाहेर कोसळणारा पाऊस कॅनव्हास वर कधी उतरवावासाच वाटला नाही आणि काळजातल्या त्या पावसा समोर रंगाचा हा पाऊस कॅनव्हॅसवर कधी बोलकाच झालाच नाही....!   © सुजित कदम ...
Read More

मराठी साहित्य – कविता ☆ गुरूपौर्णिमा विशेष चारोळी लेखन – गुरूपौर्णिमा ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते   (आज प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी  की   गुरूपौर्णिमा पर विशेष चारोळी लेखन। )   ☆ गुरुपौर्णिमा . . . ! ☆ *गुरूपौर्णिमा विशेष चारोळी लेखन*   1 माता, पिता, मानू दोघे  आद्य गुरू नाम संकीर्तन जीवनात स्मरू.. .   2 गुरु विना आहे जीवनाचा माठ जैसा निरर्थक जलाविना काठ. . . . !   3 गुरू आहे साद संस्कारांची वात अंतरी निनाद तेजाळली दाट. . . . !   4 आदर्शाची ठेव गुरूभाव दुजा तिच्या पुढे कुणी ठरू नये खुजा. . . !   5 शिष्याचे जीवन गुरु एक नाम आळसाने कधी गाठू नये धाम. . . . !   6 गुरू आहे पारा अंतरी मतीचा दाखवी चेहरा नैतिक नितीचा.. . . !   7 ज्ञान देण्या येई जीवनी शिक्षक देई अनुभव तोच परिक्षक. . . . !   8 मौज मजेतही नाही कुणा रजा मित्र होता गुरु वेळ काळी सजा.. . !   9 ज्ञानदाता आहे गुरूचेच रूप. ठेवावे सोबत त्याचे निजरूप. . . . !   10 आज्जी,मामी,काकी गुरू दृष्टी क्षेप मायेमध्ये दडे लेकराची  झेप. . . !   11 नावे कोणाला कोणी गुरूजन घेणार्‍याने घ्यावे दात्यानेच मन  .. . . !   12 कला,क्रिडे मध्ये हवा अविष्कार अनुभवी व्यक्ती गुरू जाणकार. . . . . !   13 दिल्यानेच मिळे केल्यानेच होई ज्ञान, गुण,  किर्ती गुरूपदा नेई .. . . !   14 परिसाच्या संगे लोह  आकारते गुरू कांचनाने देह साकारते. . . . !   15 नसावा विवेक असावा विचार गुरू नाम घेता नसावा विकार. . . . !   16 गुरु माझी आई गुरू माझा बाप ओळखला ईश हरे भवताप ....
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #8 – त्याचा गुरू ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे   (वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है ।  साप्ताहिक स्तम्भ  अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण  कविता  “ त्याचा गुरू”।)   ☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #  8 ☆ त्याचा गुरू   वाट सारुनीया मागे चालला हा वाटसरू सोबतीला नाही कुणी त्याचे पाय त्याचे गुरू   हिरवळीचा मी पांथ कधी काट्यामध्ये फिरू वेल कोवळ्या फुलांची तिला सावरून धरू   सुख पुढे नेण्यामध्ये कधी यशस्वी ही ठरू अपयशाचे गारूड त्याला मातीमध्ये पुरू   जेव्हा  सूर्य माथ्यावर तेव्हा  छाया देती तरू पंख वाटतात फांद्या त्याच्या कुशीमध्ये शिरू   © अशोक श्रीपाद भांबुरे धनकवडी, पुणे ४११ ०४३. मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८ ashokbhambure123@gmail.com  ...
Read More

मराठी साहित्य – कविता ☆ गुरूपौर्णिमा विशेष चारोळी लेखन – गुरूपौर्णिमा ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते   (आज प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी  की   गुरूपौर्णिमा पर विशेष चारोळी लेखन। )   ☆ गुरुपौर्णिमा . . . ! ☆   ज्ञानार्जन,  ज्ञानदान नित्य हवे देणे घेणे शिकविते चराचर ज्ञान सृजनाचे लेणे. . . . !   गुरू रूप ईश्वराचे जगण्याचा मार्ग देते. कृपा प्रसादे करून सन्मार्गाच्या पथी येते. . . . . !   गुरू ईश्वरी संकेत संस्काराची जपमाळ शिकविते जिंकायला संकटांचा वेळ,  काळ. . . . . !   चंद्र  प्रकाशात जसे तेज चांदणीला येते पौर्णिमेत आषाढीच्या व्यास रूप साकारते.. . . !   माणसाने माणसाला घ्यावे जरा समजून ऋण मानू त्या दात्यांचे गुरू पुजन करून. . . . !   संस्काराचा  ज्ञानवसा एक हात देणार्‍याचा पिढ्या पिढ्या चालू आहे एक हात घेणार्‍याचा.   असे ज्ञानाचे सृजन अनुभवी धडे देते जीवनाच्या परीक्षेत जगायला शिकविते. . . !   ज्ञानियांचा ज्ञानराजा व्यासाचेच नाम घेई. महाकाव्ये , वेद गाथा ग्रंथगुरू ज्ञान देई. . . . !     © विजय यशवंत सातपुते यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009. मोबाईल  9371319798.  ...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – 🍁 रंजना जी यांचे साहित्य #-7 – अभंग – आम्ही वारकरी 🍁 – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे    (श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। अब आप उनकी अतिसुन्दर रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनके द्वारा रचित  “अभंग - आम्ही वारकरी”।)   साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #-7      अभंग - आम्ही वारकरी (अभंग- 6 6 6 4) नित्य नेम वारी। पावन पंढरी। आम्ही वारकरी। पंढरीचे।   वारीची पताका। ऐक्याचा संदेश। जात, धर्म, वेश। एक आम्हा।   पवित्र तुळस। मांगल्य कळस। सोडून आळस। घेऊ डोई।   टाळ विणा करी। नाद गगनांतरी। विठाई आंतरी। अखंडीत   वैष्णवांची भक्ती । अलौकिक शक्ती। कलीची आसक्ती । व्यर्थ जाय।   नामामृत गोडी। चाखतो आवडी। ध्यास घडोघडी माऊलींचा।   निर्गुण माऊली। भक्तांची सावली। संकटी धावली। सर्वकाळ।   संत सज्जनास। आस ही मनास। द्वैत बंधनास। तोडी वारी।   ©  रंजना मधुकर लसणे आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली 9960128105   ...
Read More

मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तम्भ – स्वप्ना अमृतकर यांची कविता अभिव्यक्ती # 5 ☆ मोहक थेंब ☆ सुश्री स्वप्ना अमृतकर

सुश्री स्वप्ना अमृतकर (सुप्रसिद्ध युवा कवियित्रि सुश्री स्वप्ना अमृतकर जी का अपना काव्य संसार है । आपकी कई कवितायें विभिन्न मंचों पर पुरस्कृत हो चुकी हैं।  आप कविता की विभिन्न विधाओं में  दक्ष हैं और साथ ही हायकू शैली की सशक्त हस्ताक्षर हैं। हमने  आपका  “साप्ताहिक स्तम्भ – स्वप्ना अमृतकर यांची कविता अभिव्यक्ती” शीर्षक से प्रारम्भ किया है। आज प्रस्तुत है सुश्री स्वप्ना जी की  हायकू शैली में कविता “मोहक थेंब”। )   ☆ साप्ताहिक स्तम्भ – स्वप्ना अमृतकर यांची कविता अभिव्यक्ती # -5 ☆  ☆ मोहक थेंब ☆    मोहक थेंब पाण्यावर सजला मनी रुजला ..        १   हिरव्या रांनी थेंबा थेंबा ची नक्षी निसर्ग साक्षी ..       २   भिजती पाने थेंबांची च साखळी सुमन कळी ..          ३   इवलें थेंब पानावर हालले स्मित हासले ..       ४   उनाड वर्षा छेडीताच थेंबांना शांत राहिना ..        ५   © स्वप्ना अमृतकर , पुणे...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात # 7 – पाऊस ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे     (आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात”  में  उनकी  वर्षा ऋतु से संबन्धित कवितायें और उनसे जुड़ी हुई यादें। निःसन्देह यादें अविस्मरणीय होती हैं।  विगत अंक में सुश्री प्रभा जी ने "रिमझिम के तराने" शीर्षक से वर्षा ऋतु और उससे संबन्धित साहित्यिक संस्मरण साझा किए थे।  कृषि पृष्ठभूमि से जुड़े होने से वर्षा ऋतु में गाँव की मिट्टी की सौंधी खुशबू, धन-धान्य से परिपूर्ण जीवन के संस्मरण, घर के वयोवृद्ध जनों का स्नेह निःसन्देह आजीवनअविस्मरणीय  होते हैं। साथ ही सूखे और अकाल के दिन भी हमें रुलाते हैं। उन्होने इस सुदीर्घ साहित्यिक अविस्मरणीय इतिहास को सँजो कर रखा और हमारे पाठकों के साथ साझा किया इसके लिये उनका आभार और लेखनी को नमन ।  आज प्रस्तुत है उनका संक्षिप्त आलेख "पाऊस" एवं तत्संबंधित कविता "आठवणी"।  अब आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)   ☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 7 ☆   ☆ पाऊस  ☆   पावसाच्या माझ्या ज्या काही आठवणी...
Read More