सुश्री आरूशी दाते

? मी_माझी  – #1 – Space ? 

(हमें आपको यह  सूचित करते  हुए अत्यंत प्रसन्नता का अनुभव हो रहा है कि सुश्री आरुशी दाते जी को हाल ही में  साहित्य संपदा द्वारा आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा में उनकी कविता “वसंत” को द्वितीय  पुरस्कार से सम्मानित किया गया है। e-abhivyakti की ओर से आपको हार्दिक बधाई।

आप e-abhivyakti  में  प्रकाशित पुरस्कृत कविता “वसंत” को इस लिंक पर क्लिक कर पढ़ सकते हैं >>> http://bit.ly/2YTTIFX )

प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की प्रथम कड़ी  Space । इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी  प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। 

 

ती रुसली आहे हे त्याला माहित होतं, त्यानेही तिचा रुसवा जाण्याची वाट पाहिली… ह्या वाट पाहण्यात दोघांनी स्वतःला योग्य वाटली ती उत्तर घेऊन पुढे वाटचाल केली… मागे फिरण्याचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला…

योग्य अयोग्य ठरवायला मौनातल्या शब्दांना आधारच उरला नव्हता… स्वतःच स्वतःचे पाऊल त्या वाटेकडे न्यायचे नाही हा निर्धार पक्का झाला होता… ती म्हणते हेही माझे प्रेमच आहे, त्याला स्वातंत्र्य देण्याचे …

पण त्याला काही सांगायचं होतं का? असेल तर मग तो काही बोलला का नाही… ? तिच्या मनात हे प्रश्न अजूनही रुंजी घालत आहेत …

तो बोलला नाही, म्हणजे त्याची संमती होती का? की ती त्याची वाद संपवण्याची नवीन युक्ती होती?

Space… space…

की दोघांमधील अंतर?

सामनजस्यातून निर्माण केलेलं?

विचारांच्या स्पेस मधून फिरणं फार कठीण आहे…

ह्याची जाणीव होईल तेव्हा वेळ आणि काळ आपली कामं उरकून पुढे गेलेली असतील का?

अनेकविध प्रश्नांच्या गुंत्यातून बाहेर पडताना एक गोष्ट नक्की लक्षात येईल की आपण विणलेलं जाळं, आणि त्याचं गारुड आपल्यावर नक्की परिणाम करतं हे नक्की !

 

© आरुशी दाते

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

12 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Dr.Shivkumar Pawar

V Nice…

रवींद्र जे.सोनावणे

खुप छान .दोघांमधले अंतर आणि स्पेस यातला फरक मांडण्याचा प्रयत्न सुंदर

अनू

खुपच सुंदर .मी सध्या हे अनुभवतो आहे.

सुरेंद्र गंगाधर बालंखे

सुंदर विचार.
साहितसंपदाचा उल्लेख खुप काही सांगतो.

चंद्रशेखर जोशी

छान

Rewati Shrikant Soudikar

वाह ! दोघान मधील स्पेस … अव्यक्त अशी . सुंदर लिहिलेय .

Himaneee Mulay

स्पेस आणि अंतर! ??

शिवाजी सांगळे

खुप छान, भरपूर शुभेच्छा

किसन

सुंदर ….मोजक्या शब्दात मांडणी

शारदा ब.खेडकर

खूपच छान प्रत्येकाला वाटत असते स्वतःची अशी जागा.. आपले मत विचार मांडण्याची..अप्रतिम

Samrat

Mounam sarvartha sadhanam…hech khar.

Yogesh Vaidya

छान ..लिहिती रहा.