सुश्री प्रभा सोनवणे

 

 

(सुश्री प्रभा सोनवणे जी  हमारी  पीढ़ी की एक वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं ।  प्रस्तुत है सुश्री प्रभा जी की एक  संवेदनशील एवं भावप्रवण मराठी  कविता  “मृगचांदणी”)

 

☆ मृगचांदणी ☆

 

आमच्या उंच इमारतीच्या टेरेस वर

मी एकटीच !

विस्तीर्ण आभाळाखाली

माझी चिमुकली नजर

काय न्याहाळते आहे?

चौकातले प्रकाशमान दिवे ,

माझ्या पाठीमागे

दिवसभर सौर शक्तीला

स्वतः मध्ये सामावून घेणारी

सोलर सिस्टीम !

टी .व्ही . च्या अन्टेना ,

बुटक्या ,जुन्या घरांमध्ये

उगवलेली

ऐटदार ‘सुंदर हाईटस ‘

कधी काळी ही होती

आमची भव्य वास्तू !

किती सहजपणे बदलतात

मालकी हक्क !

वाडे कोसळून उभारलेल्या

या गगनचुंबी इमारती ……..

जगाच्या पसा-यातले

आपले अस्तित्व

नगण्य वाटू लागते ……….

तेवढयात  सळसळते

शेजारचे शिरीषाचे झाड …

वाहत्या वार्याबरोबर

माझ्यापर्यंत  येऊन पोहोचते

दरवळती रातराणी

मग मी ही होते —

आभाळातली मृग चांदणी !!

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments