कविराज विजय यशवंत सातपुते

 

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  द्वारा   रचित  एक भावप्रवण कविता )

 

☆ पहिली नेत्र पल्लवी. . . ! ☆

(लिनाक्षरी.)

 

नेत्र पल्लवी पहिली फुलारली

भावनेचा चैत्र तेथे विसावली.

 

भेटायचे दिले निमंत्रण खासे

नेत्रपल्लवी सावध टाकी फासे.

 

खेळ चालला युगायुगांचा छंद

दोन मनांचे , भावप्रीतीचे बंध.

 

आहे अवखळ ,नजरेची भाषा

जाते सांधत , प्रेम प्रीतीच्या रेषा .

 

एक असावी, उरात दैवी जागा.

नेत्र पल्लवी, हाच प्रीतीचा धागा.

 

क्षणी वेचले, नेत्र पल्लवी, लेणे

आठवणी या, तव ह्रदयाचे,  देणे.

 

© विजय यशवंत सातपुते

100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर 2, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.

मोबाईल  9371319798.

 

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *